शेगाव,संकेत टाइम्स : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोविड 19 लसीकरण केंद्रास आमदार विक्रमसिंह सावंत,यांनी भेट दिली.उपस्थित नागरिक व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पाराया बिराजदार,माजी सभापती बाबासाहेब कोडग,गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर,तालुका आरोग्य अधिकारी संजय बंडगर,विस्तार अधिकारी संकपाळ,चव्हाण,प्रभारी वैद्यकीय अधिकारी सौ.पाटील उपस्थित होते.
दरम्यान आ.सांवत म्हणाले,कोविड -19 यावरची लस पुर्णत: सुरक्षित आहे.मीही ही लस घेतली आहे. सध्या 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरू आहे.शेगाव परिसरातील नागरिकांना लस टोचून घ्यावी.लसीकरणा नंतरही मास्क,सोशल डिस्टसिंग पाळण्याची गरज आहे. आपण सर्वांनी कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज राहूया, असे आवाहनही केले.
शेगाव ता.जत येथे कोविड लसीकरण केंद्राला आ.विक्रमसिंह सांवत यांनी भेट दिली.







