कृष्णामाईचे पाणी आवंढीच्या शिवारात दाखल
जत,संकेत टाइम्स : अनेक अडचणीनंतर कृष्णामाईचे पाणी आवंढीच्या शिवारात दाखल झाले आहे.कायम दुष्काळाचा कलक पुसुन टाकण्यासाठी आवंढीचा शेतकरीराजा सज्ज झाला आहे.प्रदिर्घ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज शनिवारी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या बंधिस्त पाईपलाईन मधून आलेल्या पाण्याचे पुजन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आप्पाराया बिराजदार, माजी सभापती बाबासाहेब कोडग,माजी उपसरपंच प्रदिप कोडग,डी.डी.कोळसे, जगदीश बाबर,मोकाशेवाडीचे सरपंच आण्णासाहेब गायकवाड,समाधान काशीद,कुंदन बोरगे,ग्रा.पं.सदस्य लालासाहेब देशमुख, सौ.रत्नमाला कोडग,सौ.मुगाबाई कोडग,सौ.पार्वती कोडग,सौ.नंदा कोळी,सौ.संगिता देशमुख, सोसायटीचे चेअरमन माणिक पाटील, माजी उपसरपंच अनिल कोळी,विठ्ठल कोडग,रामचंद्र कोडग,एस.आर.कोडग,भारत कोडग महाराज व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सावंत म्हणाले की,या बंदिस्त पाईपलाईनच्या कामाचे ईस्टिमेट शासनाकडून रद्द करण्यात आले होते.आम्ही सातत्याने पाठपुरावा करुन रिवाईज ईस्टिमेट करुन कामास गती मिळवली.म्हणूनच आज आपल्याला कृष्णामाईचे पाणी मिळाले आहे.भविष्यात शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होऊन तरुणांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

दरम्यान आमदार सांवत यांनी आवंढी ते सोनंद रोडच्या डांबरीकरण कामाची पहाणी करुन मधला मळा विहिरीवरील कठडा,सोळगेवाडी ओढा,पाटील ओढा , याठिकाणी ठेकेदारांना दर्जेदार काम करण्याच्या सुचना दिल्या.संत श्री.बाळूमामा मंदिराला आ.सांवत यांनी भेट देता दर्शन घेतले.
आंवढी ता.जत येथे आलेल्या म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे पुजन आ.विक्रमसिंह सांवत यांनी केले.