प्रज्ञा काटेला राज्यस्तरीय ‘आदर्श बाल गौरव कलारत्न’ पुरस्कार
जत,संकेत टाइम्स : जत येथील प्रज्ञा बाबासाहेब काटे हीचा राज्यस्तरीय ग्लोबल अविष्कार फाऊंडेशन, पुरस्कार 2021 साठीचा राज्यस्तरीय आदर्श बाल गौरव कलारत्न पुरस्कार जाहीर सामाजिक, शैक्षणिक,औद्योगिक, कला, क्रिडा, वैद्यकिय व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेली संस्था ग्लोबल अविष्कार फाऊंडेशन, नांदेड यांच्यावतीने समाजातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना ग्लोबल अविष्कार फाऊंडेशन पुरस्कार देवून सन्मानित केल्या जाते.
आपण आपल्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल समाजासाठी, आदर्श व प्रेरणादायी आहे.आपल्या कार्याची प्रेरणा समाजातील इतरांना मिळण्यासाठी आपणास राज्यस्तरीय ग्लोबल अविष्कारफाऊंडेशन 2021 च्या राज्यस्तरीय आदर्श बाल गौरव कलारत्न पुरस्कार 2021 पुरस्कारासाठी प्रज्ञा काटे हिची निवड करण्यात आली आहे.

भविष्यात कोविड परिस्थिती लक्षात घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येईल व दिनांक,वेळ,स्थळ हे कार्यक्रम पत्रिके द्वारे आपणास यथावकाश कळविण्यात येईल असे संयोजकांनी कळवले आहे.
