उमराणी,संकेत टाइम्स : उमराणी ता.जत येथे 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरणास सुरूवात करण्यात आली. कन्नड शाळा सभागृह येथे हे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.सरपंच विजय नामद यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरणास प्रांरभ करण्यात आला.
यावेळी ग्रामसेवक,बिळुर आरोग्य केंद्राचे डाॅ. मुल्ला, जाधव नर्स आशावर्कर चोपदार ,शिंदे,अरकेरी, बिरादार उपस्थित होते. 45 वर्षांवरील सर्व महिला/पुरुष यांनी त्यांचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात येत आहे.







