आंवढीत रंगला श्रेयवाद | बंधिस्त पाईपलाईनमधून पुजनापुर्ते पाणी सोडले ; शशिंकात कोडग याचा आरोप

0

आंवढी,संकेत टाइम्स : आंवढी ता.जत येथे बंधिस्त पाईपलाईनचे पाण्याची चाचणी सुरू असताना शनिवारी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी पुजन करून काय साध्य केल,ते माघारी फिरताच पाणी बंद झाल्याने पुजन करून श्रेय घेण्याचा खटाटोप फसला,असल्याचा आरोप युवा नेते शशिंकात कोडग यांनी केला आहे.कोडग पुढे म्हणाले,मुळात बंधिस्त पाईपलाईनवर टिका करणारे आ.सांवत यांनी या योजनेसाठी किती वेळा पाठपुरावा केला हा संशोधनाचा मुद्दा आहे.खरेतर खा.संजयकाका पाटील व माजी आमदार विलासराव जगताप यांनी योजना मंजूर केल्याने आज आंवढीपर्यत पाणी येऊ शकले आहे.


मात्र गेल्या आठवड्यात काम पुर्ण झाल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सध्या चाचणी घेण्यात आहे.काही ठिकाणचे लिकेज,किरकोळ दुरूस्तीची कामे करण्यात येत आहेत.असे असताना श्रेयवादासाठी पाणी पुजनाचा घाट शनिवारी घालण्यात आला.


Rate Card

कोडग म्हणाले, तब्बल दोन तास वाट पाहिल्यानंतर आंवढीत पाईपलाईन मधून पाणी दाखल झाले.मात्र तोपर्यत‌ आ.सांवत यांना आंवढीत बसावे लागले.

कमी प्रमाणात येत असलेल्या पाण्याचे पुजन करण्यात आले. पुजन कर्ते अजून गावात‌ पोहचण्या अगोदरचं पाणी बंद झाले होते.योजनेचे सर्व काही माहिती असलेले भाजपचे कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थितीत राहतात,हेही दुर्देव्य म्हणावे लागेल.


नेमके अशा प्रकाराने कुणाला काय साध्य करायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.खरेतर योजनेसाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केलेले खा.पाटील व माजी आमदार जगताप यांना पाणी पुजनाचा अधिकार आहे.पुर्ण क्षमतेने पाणी दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडून हा कार्यक्रम होईलच, मात्र,जनतेला फसविण्याचा उद्योग आंवढीतही फसला,ऐवढे मात्र निश्चित असेही शशिकांत कोडग म्हणाले.Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.