अवैध व्यवसायाची माहिती गुन्हे विभागाला कळते, स्थानिक पोलिसांना का नाही
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात दोन पोलीस स्टेशन आहेत.या पोलीस स्टेशन हद्दीत अनेक अवैध व्यवसाय सुरू आहेत. या व्यवसायाची गोपनीय माहिती सांगली येथील गुन्हे शाखेच्या पथकाला मिळते, मग स्थानिक पोलिसांना का मिळत नाही, असा सूर आता जनतेतून उमटू लागला आहे.तालुक्यातील जत व उमदी या ठिकाणी पोलीस स्टेशन आहेत.
तालुक्यात,जत,डफळापूर,उमदी,संख,शेगाव,बिळू

शिवजयंती शांततेत साजरी व्हावी यासाठी सर्व पोलीस पाटलांनी बैठकीतच अवैध दारूविक्री करणाऱ्यांची नावे देऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती.काही विक्रेत्यांवर कारवाई झाली. परंतु कारवाईनंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या प्रमाणे अवैध दारूविक्री सुरू झाली. गुटखा विक्री कायमच आहे. वरली तर पुढाऱ्यांची मक्तेदारी झाली आहे. खरे तर रात्रीची संचारबंदी लागू असताना हे लोक एकत्र बसले कसे? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. आज जत येथे रहदारीच्या ठिकाणी अवैध दारूविक्री सुरू आहे.