दरिबडची उपकेंद्रात कोरोना लसीकरणास सुरूवात

0
6



दरिबडची, संकेत टाइम्स : दरिबडची, ता.जत येथील उपकेंद्रात 45 वर्षे वयावरील सर्व लोकांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे.संरपच गंगाधर मोरडी,अजित सनदी,आशा वर्कर्स यांच्या उपस्थितीत लस टोचून सुरूवात करण्यात आली.पहिल्या दिवशी 24 जणांनी लस टोचून घेतली.यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी विश्वनाथ मोरडी,आरोग्य सेवक किरण शिंगे,मालन बडिगेर यांच्याकडून लसीकरण करण्यात येत आहे.





लस टोचून घेतलेल्या कोणत्याही नागरिकांना त्रास झालेला नाही.लस एकदम सुरक्षित आहे.सर्वांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे,असे आवाहन यावेळी आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.







दरम्यान जत तालुक्यातील 2 रुग्णालये,8 प्राथमिक आरोग्य केंद्रे,15 उपकेंद्रात लसीकरण व्यवस्था सुरू असून संबंधितांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रांताधिकारी प्रंशात आवटे, तहसीलदार सचिन पाटील तसेच गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी केले आहे. तालुक्यातील सुमारे 8हजार 495 लोकांनी लसीकरन करून घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.






दरिबडची ता.जत येथे 45 वर्षावरील नागरिकांच्या कोरोना लसीकरणास प्रांरभ करण्यात आला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here