मिरज रोडवरील महात्मा फुले स्मारकाची प्रचंड दुरवस्था; मनपाचे दुर्लक्ष

0



सांगली : राष्ट्रपिता जोतीबा फुले व क्रांतीजोती सावित्रीमाई फुले यांनी शेतकरी आणि, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील अस्पृश्य तसेच स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी लढा दिला. फुले दाम्पत्यांचे कार्याचा व त्यागाचा विसर महानगरपालिका आयुक्त, महापौर व नगरसेवकांना पडलेला आहे.






सांगली मिरज रोडवरील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल समोर असणारे राष्ट्रपिता जोतीबा फुले यांचे स्मारक व उद्यान दि.4 मे सन 1984 रोजी मिरज नगरपरिषद यांनी बांधलेले आहे. 1998 पासून महानगरपालिकेत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. पुरोगामित्वचा टेंभा मिरवणारे व संबंधित राजकारण्यांनी फुले शाहू आंबेडकर यांचा नावाचा वापर केवळ मतांसाठी करून मोठे मोठे मंत्रिपद मिळवले, सत्ता भोगली, मनपात नगरसेवक, महापौर पदे मिळवले; पण महापुरुषांचा त्यागाचा इतिहास पायदळी तुडवत या स्मारकाला जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले.





या महात्मा फुले यांची स्मारकाची प्रचंड दुरवस्था आहे व याची निगा अजिबात राखली जात नाही. जवळील गटारी खोदकामातील कचरा, घाण पाणी येथे आणून टाकून विटंबना करण्यात आली आहे यातून मनपा प्रशासनाचा जातीवादी चेहरा उघड झाला आहे. या स्मारकाचा पंचनामा ऑल इंडिया पॅथर सेना, रिपब्लिकन स्टुडंट युनियन यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी महासचिव अमोल वेटम, जिल्हा अध्यक्ष स्वप्नील खांडेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Rate Card





 दि.11 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीच्या आधी याची स्वच्छता व दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्यात येईल. आयुक्त, महापौर यांना या महापुरुषांचा स्मारकाच्या विटंबना प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असे महासचिव अमोल वेटम, जिल्हा अध्यक्ष स्वप्नील खांडेकर म्हणाले.





मिरज रोडवरील महात्मा फुले स्मारकाची झालेली प्रचंड दुरवस्था

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.