राजे रामराव महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी एस.एस.पाटील यांची नियुक्ती
जत,संकेत टाइम्स : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे राजे रामराव महाविद्यालयांच्या प्रभारी प्राचार्य पदी तासंगावचे डॉ.एस.एस.पाटील यांची निवड करण्यात आली.
महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. विठ्ठलराव ढेकळे यांच्या बदली नंतर प्राचार्य पदाची धुरा डॉ.आप्पासाहेब भोसले यांच्याकडे सोपविण्यात आली होती.चार महिन्यांच्या कालावधीघ नंतर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदाची धुरा डॉ.एस.एस.पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समव्यक डॉ शिवाजी कुलाळ,प्रा. एस एस चव्हाण,प्रा.एम.एच. करेन्नवार व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉ.एस.एस. पाटील यांचा सत्कार करताना डॉ.ए.के.भोसले,प्रा.सिद्राम चव्हाण,प्रा.एम.एच.करेन्नवार