संख तलावातील उजव्या कालव्याची गळती थांबवा

0जत,संकेत टाइम्स : संख,ता.जत येथील मध्यम प्रकल्पाकडे‌ पाटबंधारे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ही बाब नवी नाही,गेल्या अनेक वर्षापासून तलावाचे कालवे,बांधातून गळती होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आता नव्याने तलावाच्या उजव्या कालव्याला गळती होऊन लाखो लिटर पाणी वाया जात आहे. ते बंद‌करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.


संख मध्यम प्रकल्प पूर्ण होऊन वीस वर्षे होऊन गेले.तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असणारा हा तलाव साडेअठरा एकर जमिनीवर व्यापलेला आहे.

एवढ्या‌ मोठा तलाव भरण्यासाठा तेवढाच पाऊस पडण्याची गरज असते.नव्याने बांधकाम झाल्यानंतर हा प्रकल्प 1995 ला पहिल्यांदा एका रात्रीत झालेल्या तुफान पाऊस पूर्णपणे भरला होता.गतवर्षीही तलाव भरला होता.Rate Card
तलावात 703 दशलक्ष घनफूटापेक्षा जादा पाणी साठा करण्याची क्षमता आहे. या मध्यम प्रकल्पाला दोन कालवे आहेत.एक उजवा कालवा तर,दुसरा डावा कालवा.उजवा कालवा पावणे दोन किलोमीटर भिवर्गी ओढापर्यंत तर डावा कालवा बत्तीस किलोमीटर उमदीपर्यंत अंतर इतका आहे. 


यंदा पाऊस झाल्याने संख मध्यम प्रकल्प तलाव पूर्णपणे भरलेला आहे.शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी होत आहे. मात्र तत्पुर्वी तलावातील कँनॉल पुर्णपणे बंद केला नसल्याने त्यातून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.