लिलाव रखडल्याने जत‌ पोलीस ठाण्याला भंगार गोडावूनचे‌ स्वरूप | शेकडो वाहनाना गंज

0जत,संकेत टाइम्स : अपघातग्रस्त वाहनांच्या बरोबरच, पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांना ठेवण्यासाठी जिल्हातील सर्वच पोलीस ठाण्यांना हक्काचा भूखंड नसल्याने, पोलीस ठाण्याच्या आवारातच दाटीवाटीने वाहने उभी करावी लागत आहेत.त्याचबरोबर जत‌ ठाण्याकडे महसूल विभागाने जप्त केलेली वाहने सर्वाधिक आहेत.महसूल विभागाकडून वर्षोन् वर्षे वाहने पडूनही त्यांचे लिलाव केले जात नाहीत,परिणामी पोलीस ठाण्याच्या मागील मैदान जप्त गाड्याचे गोडावून बनले आहे.पोलीस ठाण्यांच्या आवारात उभी असलेल्या वाहनांच्या पैकी नव्वद टक्क्यांहूनही अधिक वाहने भंगारात जमा करण्याच्या स्थितीत पोचली आहेत. यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात प्रवेश करणाऱ्यांना, ही पोलीस ठाणी आहेत की भंगार मालाची गोदामे असा प्रश्न पडत आहे.
या दाटीवाटीने उभ्या असलेली वाहनामुळे उन्हाळ्यात आग लागण्याची शक्यता धोका तर पावसाळ्यात वाहनात पाणी साचून आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जत,उमदी‌ सारख्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात वर्षोनुवर्षे उभ्या असलेल्या वाहनांचा लिलाव करावा अशी मागणी पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत ठाण्याच्या नजीक राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.अपघातात खराब झालेली वाहने वर्षानुवर्षे उभी असल्याने, त्यावर गंज चढतो. त्यामुळे या वाहनांची अवस्था भंगार मालासारखी होत असल्याने वाहनमालकही लक्ष देत नाहीत. अपघातातील वाहनांमुळे पुन्हा आपल्यावर संकट कोसळेल या भीतीनेही वाहनांचे मालक व त्यांचे नातेवाईक पोलीस ठाण्याकडे फिरकत नाहीत.न्यायप्रक्रियेसाठी लागणारा वेळ व खर्च अधिक वाटत असल्याने वाहनमालकही नवीन वाहन खरेदी केलेले बरे असा विचार करतात. ट्रक, कार ही महागडी व त्यातल्या त्यांत चांगली वाहने सोडवण्यासाठी खटाटोप केला जातो. दुचाकीसारखी वाहने सोडवण्यासाठी खर्च करण्यापेक्षा तेवढ्या खर्चात अन्य वाहने खरेदी करण्यास पसंती दिली जाते. जप्त वाहने सडू लागल्याने त्यांवरील क्रमांकही वाचता येत नाहीत. ज्यावेळी न्यायालयात पुरावा म्हणून वाहन सादर करण्याची वेळ येते तेव्हा पोलीस ठाण्याच्या आवारात पडलेल्या वाहनांमध्ये असे वाहने शोधणेही मुश्कील होते. बेवारस वाहनांचा निपटारा करण्यासाठी आरटीओकडून सहकार्य मिळत नसल्याने पोलीसही त्याकडे दुर्लक्ष करतात.जतेत महसूलची सर्वाधिक वाहने

Rate Card


जत पोलीस ठाण्यात बेकायदा वाळू तस्करी करताना जप्त केलेली वाहनेच सर्वाधिक आहेत.यातील जवळपास 90 टक्के भंगार झाली आहेत.त्यांचे दंड गाडीच्या रक्कमेपेक्षा जास्त असल्याने गाड्या सोडविण्यात उदाशीनता‌ आहे.महसूल विभागाकडून अशी वाहने विकण्याबाबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा ना चा पाडा असल्याने जत पोलीस ठाणे जप्त गाड्याच्या भंगाराचे गोडवून बनले आहे. दरम्यान आम्ही महसूल विभागाला वाहने हलविण्याबाबत कळवून लवकरचं स्वच्छता करणार असल्याचे डिवायएसपी रत्नाकर नवले यांनी सांगितले.

जत‌ पोलीस ठाण्यातील गंज चढलेली वाहने

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.