रेवनाळमध्ये युवकांवर प्राणघातक हल्ला | चौघाविरोधात गुन्हा दाखल

0



जत,संकेत टाइम्स : रेवनाळ ता.जत येथे पैशाच्या देवाणघेवाण वरून युवकांवर धारदार शस्ञाने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.हल्ल्यात युवक सार्थक नागेश पाटील हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी जत पोलीसात रामकृष्ण रावसाहेब वाघमोडे,समाधान सिताराम वाघमोडे,पोपट सदाशिव वाघमोडे,सुरेश आप्पासो ओलेकर (सर्वजण रा.रेवनाळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,रेवनाळ येथे राहणारे सार्थक पाटील हा गावातील युवराज पाटील यांच्या सोबत गावातील टान्सफार्म जवळ बोलत उभे असताना संशयित रामकृष्ण वाघमोडे यांने तु आमचे मुरूम टाकलेले पैसे आतापर्यत का दिला नाहीस, पैसे आताच्या आत्ता दे,असे म्हणत चौघांनी संगनमत करून शिवीगाळ,दमदाटी करत सार्थक याला तुला जीवंत सोडत नाही म्हणत रामकृष्ण वाघमोडे यांने हातातील धारदार सुऱ्या सारखे हत्यारांने पोटात खुपसून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.त्यात सार्थक गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


Rate Card






दरम्यान याप्रकरणी सार्थकचे वडील नागेश म्हाकू पाटील यांनी जत पोलीसात फिर्याद दिली आहे.पोलीसांनी भारतीय दंड सहिता प्रमाणे 307,504,506,34 कलमा खाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणास अटक केलेली नाही.अधिक तपास उपनिरिक्षक आप्पासाहेब कत्ते करत आहेत.



shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.