बेवनूर : बेवनूर ता.जत येथील म्हसोबा देवाची सालाबाद प्रमाणे होणारी यात्रा यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.
जत,आटपाडी,कवटेमहांकाळ, सांगोला तालुक्याच्या सिमेवर असणाऱ्या बेवनूर येथील जागृत्त देवस्थान म्हसोबा देवाची यात्रा दरवर्षी एप्रिल महिन्यात भरविण्यात येत होती.
यंदा बेवनूरसह आसपासच्या गावात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रा रद्द केल्याची घोषणा करण्यात आली आहे.तशी नोटीस ग्रामपंचायतीनी नोटिस बोर्डावर लावली आहे.







