स्व.वसंतदादा पाटील स्मारक विकासासाठी 4 कोटी 82 लाख निधीसाठी मान्यता

0मुंबई :  स्व.पद्मभुषण वसंतदादा पाटील यांच्या सांगली  जिल्ह्यातील स्मारकाच्या शिल्लक कामासाठी 4 कोटी 82 लाख रुपये एवढ्या निधीला आज सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्यमंत्री, डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील दालनात पार पडलेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.माजी मुख्यमंत्री स्व.पद्मभुषण वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात यावी या मागणीसाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील याबरोबरच सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे मागणी केली आहे. डॉ. वसंतदादा पाटील यांना मानणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची तसेच सामान्य जनतेची सांगली व राज्यामध्ये फार मोठी संख्या आहे. 

स्व. वसंतदादा पाटील यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध झाल्याने उर्वरीत कामे पुर्ण करण्यासाठी गती मिळणार आहे.  यामध्ये प्रामुख्याने सुसज्ज असे ग्रंथालय, अभ्यासिका, कलादालन, विस्तार कक्ष, प्रशासकीय कक्ष आदी अपुर्ण असलेल्या  कामाना गती मिळणार आहे. या स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीचे काम सांगली महानगरपालिकेच्या माध्यमातून केले जाणार आहे.


सदर मागणीसाठी बैठकीमध्ये जिल्हाधिकारी, डॉ. अभिजीत चौधरी यांनी आतापर्यंत स्मारकासाठी जवळपास 12 कोटी खर्च झाला असून ज्या सुविधा पुर्ण झाल्या आहे, त्या जनतेसाठी खुल्या केल्या आहेत यामध्ये  प्रामुख्याने 150 विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उपलब्ध झाली आहे असे डॉ. चौधरी यांनी बैठकी दरम्यान सांगितले.  Rate Card
यावेळी या बैठकीत बोलताना राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले की, स्व.वंसतदादा पाटील यांचे राज्यातील आणि जिल्ह्यातील सहकार, कृषी, सामाजिक व राजकीय आदी क्षेत्रातील कार्य हे निश्चितच प्रेरणादायी स्वरूपाचे आहे. स्व. वसंत दादांच्या स्मारकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील तसेच राज्यातील नव युवकांना कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल.


यावेळी या बैठकीला आ.विक्रम सावंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, श्री.गायकवाड, सामान्य प्रशासन विभागाचे उप सचिव ज.ना.वळवी, व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, कार्यकारी अभियंता, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका, खाजगी सचिव, श्री.संपत डावखर आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.स्व. वसंतदादा पाटील स्मारक भवनसाठी 

आयोजित बैठकीत बोलताना मंत्री विश्वजीत कदम,आ.विक्रमसिंह सांवत,बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.