शेगावमध्ये गांज्या शेतीवर छापा | सव्वा लाखाचा गांज्या जप्त,एकजण ताब्यात

0जत,संकेत टाइम्स : शेगाव ता.जत येथे गांज्या शेततीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने छापा टाकून 1 लाख 29 हजार रूपयाचा गांजा जप्त केला.

याप्रकरणी तानाजी जगन्नाथ शिंदे( वय 62,रा.गुळवंची रोड,शेगाव)यांना ताब्यात घेतले आहे.


पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शेगाव ता.जत येथील गुळवंची रोड येथे राहणारे तानाजी शिंदे यांनी गांज्याची रोपे लावल्याची माहिती खबऱ्याद्वारे स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.त्या आधार बुधवारी छापा टाकला असता 3 ते 5 फुटाची साडे एकवीस किलो वजनाची ओलसर झाडे जप्त केली.त्यांची बाजार भावाप्रमाणे 1 लाख 29 हजार रूपये किंमत होते.याप्रकरणी तानाजी जगन्नाथ शिंदे ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हि कारवाई केली.

Rate Card


दरम्यान जत पुर्व भागातील गांज्या लागवडीचे प्रस्थ उत्तर भागातही वाढल्याचे चित्र असून स्थानिक पोलीसांच्या दुर्लक्षाने असे अवैध प्रकार बळावले आहेत.अधिक तपास पो.नि.उत्तम जाधव करत आहेत.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.