काकासाहेब सांवत यांची ‘उद्यान पंडित’ पुरस्कारासाठी निवड
बनाळी,संकेत टाइम्स : येथील
श्री बनशंकरी नर्सरी अंतराळ (बनाळी) ता.जत.जि.सांगली.चे मालक काकासाहेब रावसाहेब सावंत यांची महाराष्ट्र शासनाच्या उद्यान पंडीत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार
बनाळी/अंतराळ सारख्या छोट्या गावात बनशंकरी नर्सरीची स्थापना करून त्यांनी दुष्काळी भागात अत्याधुनिक शेती करता येत हे दाखवून दिले आहे.

सांगली,सोलापूर,सातारा,अथणी,
विजापूर या भागात बनशंकरी नर्सरीची दर्जेदार रोपे विकली जात आहे.या नर्सरीच्या माध्यमातून शेतीतील नाविन्यपुर्ण बदल त्यांनी घडवून दाखविले आहे.अनेक शेतकऱ्यांना आदर्श असणारा शेती उद्योग उभा केलेले काकासाहेब सावंत यांचा महाराष्ट्र शासनाच्या कृषी,पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडून गौरव करत त्यांना उद्यानपंडित पुरस्काराने गौरव केला असून या पुरस्कारासाठी सावंत यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. पुढील महिन्यात या पुरस्काराचे मुंबई येथे वितरण होणार आहे.
