डफळापूर परिसरात विज पुरवठा विस्कळीत

0डफळापूर, संकेत टाइम्स : डफळापूर ता.जत येथील महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे परिसरातील ग्राहकांना फटका बसत आहे.

दररोज विज पुरवठ्याचा खेळखंडोबा केला जात असून एका तासात तब्बल चार-पाच वेळा वीज पुरवठा खंडीत होत आहे.यादरम्यान वोल्टेज कमी-जास्त होत असल्याने विद्युत बल्प, इलेक्ट्रॉनिक वस्तू,संगणक,फ्रिज जळण्याचे प्रमाण वाढले असून व्यवसायकाचेही नुकसान होत आहे.
Rate Cardयाबाबत सातत्याने तक्रारी करूनही महावितरणचा हा कारभार सुधारत नसल्याचा आरोप होत आहे.

या सब स्टेशनला नेमून दिलेले अधिकारीही आठवड्यातून एकाद्या,दुसऱ्या दिवशी उपस्थित राहत आहेत.परिणामी कर्मचाऱ्यां वरचे नियंत्रण सुटले असल्याने सातत्याने विज पुरवठा विस्कळीत होत असल्याचे ग्राहकांचे आरोप आहेत.तातडीने कारभार सुधारावा अन्यथा,तीव्र आंदोलन करू,असा इशारा दयानंद संकपाळ यांनी दिला आहे.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.