कुडणूर आई,बायको,दोन मुलींच्या खून प्रकरणातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा
सांगली : आई,बायको व दोन मुलींचा खून करणा-या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सांगली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. व्ही. बी. पाटील यांचेसमोर हा खटला सुरू होता.यातील आरोपी भारत कुंडलिक इरकर (वय-49 वर्षे, रा. कुडनुर, ता. जत, जि. सांगली) यास भारतीय दंडसंहिता कलम 302 अन्वये दोषी धरून सश्रम कारावासाची जन्मठेपेची शिक्षा व
रक्कम रुपये 5000/- दंड, दंड न दिल्यास आणखी एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली, याकामी सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल श्री. अरविंद आर. देशमुख यांनी काम पाहिले.
याबाबतची थोडक्यात हकीकत अशी की, सन 2016 मध्ये आरोपी भारत कुंडलिक इरकर हा त्याची आई, बायको, दोन मुली, दोन मुले यांच्यासोबत (कुडणुर,ता.जत,जि. सांगली) येथे राहत होता. सदर आरोपी व त्यांनी साकाआई जनाबाई यांच्यामध्ये जमीनीच्या कारणावरून यापूर्वी सांगली
न्यायालयात दावा चालू होता. सदर दाव्याचा निकाल सांगली न्यायालयाने आरोपीच्या बाजूने दिलेला होता.सदर दाव्यास आरोपीची सावत्रआई जनाबाई हिने उच्च न्यायालयात आव्हान दिलेले होते.

उच्च न्यायालयामध्ये सदर दाव्याचा निकाल हा आरोपीची सावत्रआई जनाबाई हिच्या बाजूने झाला होता.त्यामुळे आरोपी हा कोर्टाच्या दाव्याच्या खर्चामुळे निराश झालेला होता व त्याचे पर प्रपंचाकडे लक्ष नव्हते.
दिनांक 10/09/2016 रोजी आरोपीने त्याची सावत्र आई जनाबाई कुंडलिक इरकर हिचेसोबत कोर्टात असलेल्या जमिनीच्या दाव्याच्या खर्गामुळे आर्थिक अडचणीत आलेमुळे आपण आपल्या बायको मुलांना व्यवस्थित साभाळू शकत नाही,या निराशेतून आरोपीने त्याची आई सुशिला इरकर, बायको सिंधूताई इरकर, मुलगी रुपाली इरकर,मुलगी राणी इरकर यांचा शेतातील मक्याचे पिकाजवळ धारधार हत्याराने पहाटे 5.00 दरम्यान डोक्यात, तोंडावर, मानेवर वार करून डोके व चेहरा छिन्नविछिन्न करून खुन केलेला होता.
सदर सेशन केसची सुनावणी सांगली येथील प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. व्ही. व्ही. पाटील यांचे न्यायालयात सुरु होती.याकामी सरकार पक्षातर्फे एकुण तेरा साक्षीदार तपासण्यात आले.
सदर प्रकरणातील फिर्यादी नागा तुकाराम माने, आरोपीचा मुलगा म्हाळाप्पा इरकर,तपासी अधिकारी युवराज मोहिते,श्री समीर कामत न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, जत यांची साक्ष महत्वाची ठरली. याकामी तपासी अधिकारी म्हणून तत्कालीन जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. युवराज मोहिते यांनी काम पाहिले. सदर प्रकरणामध्ये जत पोलीस स्टेशनचे अंमलदार श्री. शौकत इनामदार यांचे सहकार्य लाभले.
