वृक्ष अधिकाऱ्यास 75 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले | लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई | ठेकेदाराचे कामाचे बिल तयार करण्यासाठी घेतली लाच

0



सांगली : सांगली महापालिकेतील केलेल्या कामाचे बिल तयार करण्यासाठी वृक्ष अधिकारी शिवप्रसाद कोरे यांनी 75 हजाराची लाच एका ठेकेदाराकडे मागितली. ही लाच घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोरे याला रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महापालिका परिसरात खळबळ उडाली आहे.


     




तक्रारदार हे महापालिकेत शासकीय ठेकेदार म्हणून काम करतात. त्यांनी महापालिकेत केलेल्या कामाचे बिल तयार करण्यासाठी बिलाच्या 5 टक्के रक्कम लाच म्हणून द्यावी, अशी मागणी कोरे यांनी केली होती. याबाबत तक्रारदार ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

Rate Card


     




या विभागाने याबाबत 30 मार्च रोजी सापळा लावून पडताळणी केली होती. यामध्ये कोरे यांनी तक्रारदार ठेकेदाराला लाच मागितल्याने स्पष्ट झाले होते. त्यानंतर आज (31 मार्च) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा महापालिकेत सापळा लावला. यावेळी तक्रारदारकडून कोरे यांनी 75 हजार रुपये लाच स्वीकारली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोरे यांच्यावर झडप घातली. त्यांना  पैशासह रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महापालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.