जत,संकेत टाइम्स : जत शहरातील एका महिलेचा कोरोनामुळे दुर्देवी मुत्यू झाला आहे.तर पुन्हा शहरात 4 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने चिंता कायम आहे.जत तालुक्यातील कोरोना रुग्णाचा आलेख काही प्रमाणात खालावला आहे.मंगळवारी तालुक्यातील जत शहर 4 शेगाव 1,संख 1,व्हसपेठ 1,खोजानवाडी 1 असे एकूण 8 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील एका महिलेचा कोरोनामुळे दुर्देवी मुत्यू झाला आहे.
यामुळे मुत्यू झालेली संख्या 76 झाली आहे. तालुक्यातील रुग्ण संख्या 2301 वर पोहचली असून 2066 जण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या 160 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचाराखाली आहेत.दरम्यान जत शहरात कोरोना बाधित रुग्ण सातत्याने आढळून येत असतानाही प्रशासनाचे नियम पायदळी तुडविले जात आहेत.दुसरीकडे नगरपरिषद व पोलीसाकडून अशा बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्याची गरज असतानाही दोन्ही विभाग अद्यापही झोपेत असल्याचे चित्र आहे.
शहरातील प्रशासन नागरिकांचा हालगर्जीपणा धोका वाढविणारा आहे.
हॉटस्पॉट बनलेले कासलिंगवाडीतील रुग्ण संख्या नियत्रणांत आली असून नागरिकांची सतर्कता,आरोग्य विभागाचे प्रयत्न येथे सफल झाल्याचे चित्र असून गेल्या तीन दिवसात येथील एकही नवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही.कोरोना बाधित नागरिकांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरू आहेत.आरोग्य विभाग त्यावर लक्ष ठेवून आहेत.कोरोनाचा कमी झालेला प्रभाव समाधान व्यक्त करणारा आहे.