जत पोलीसांना वाळू तस्करांत इटरेस्ट ?

0



जत,संकेत टाइम्स : जत पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यां कडूनही वाळू तस्करांना बळ देण्याचा प्रकार घडत आहे.महसूल विभागाचे दुर्लक्ष किंबहुना छुप्या पांठिब्यामुळे तालुकाभर वाळू तस्करांचे पेव फुटले असून जत पश्चिम भागातील कुडणूर ओढापात्र,तलावे,उत्तर बाजूतील सिंगनहळी ते वाळेंखिडीतील कोरडा नदी पात्र वाळू तस्करीची ठिकाणे बनली आहेत.






जत उत्तर भागात‌ील तस्करांना थेट महसूल प्रशासना बरोबर पोलीसांचेही अभय असल्याचे बोलले जात आहे.तर जत पश्चिम भागात कामगिरीवर असलेले महसूल, पोलीस कर्मचाऱ्यांना महिन्याकाठी इमान इतबारे वजन ठेवले जात असल्याने सर्वकाही उघड्यावर,दिवसाढवळ्या सुरू आहे.


Rate Card





तालुक्यात एकादे वाळू तस्करी करणारे वाहन पकडले तर महसूल प्रशासन ते वाहन पोलीसांच्या ताब्यात देतात.पोलिस ठाण्यात लावलेले वाहन आमचा काही संबध नाही,ती महसूल विभागाची कारवाई असल्याचे सांगत पोलिस सोयीनुसार कार्य करत आहेत.त्यामुळे एकाला न्याय तर दुसऱ्यावर अन्याय करत असल्याचे आरोप होत आहेत.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.