जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात 30 ग्रामपंचायतींसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराची बुधवारी सायंकाळी सांगता झाली आहे. यंदा उमेदवारांना प्रचारासाठी अवघे आठच दिवस मिळाले होते.त्यामुळे गावागावात प्रचाराची रणधुमाळी उडाली होती. उमेदवारांनी प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर देत प्रचार यंत्रणा राबविली.
जत तालुक्यातील 278 पैकी 31 जागा बिनविरोध तर एक जागा रिक्त झाल्याने उर्वरित जागांसाठी येत्या 15 तारखेला मतदान होणार आहे.
एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपुष्टात येणाऱ्या जत तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.उमराणी,शेगाव,अंकले,तिकों
दिनांक 4 जानेवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप होताच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली होती. मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेठी घेण्याबरोबरच ग्रामपंचायतीच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या आश्वासनांचीही खैरात करण्यात आली. काही गावांमध्ये पक्षीय राजकारणाचे देखील पडसाद दिसून आले. यंदा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी व्यापक प्रयत्न झाले. मात्र, उमेदवारी कायम राखणाऱ्या उमेदवारांमुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे. बुधवारी शेवटच्या दिवशी प्रचार सिगेला पोहचला होता.
अनेक पँनेलकडून मोठे शक्तिप्रदर्शन आले.आज गुप्त प्रचाराचा दिवस असल्याने उमेदवार सकाळपासून कामाला लागणार आहेत.अनेक उमेदवार,पँनेलचे ब्रम्हास्ञ आज मैदानात उतरविले जाणार आहे.
प्रशासकीय तयारी
येत्या 15 तारखेला मतदान होणार असल्याने मतदानाच्या एक दिवस आधी मतदान कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचणार आहेत. त्यानुसार तालुका पातळीवर कर्मचारी तसेच त्यांच्यासाठी लागणाऱ्या साहित्यांचे नियोजन करण्यात आले. केंद्रांवर पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांना वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवारी कर्मचारी आपापल्या केंद्रांवर पोहोचतील. तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींमधील 101 मतदान केंद्रांवर 708 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.त्यात 118 मतदान पथके(केंद्राध्यक्ष,3 इतर कर्मचारी,1शिपाई,1पोलीस कर्मचारी)तसेच 11झोन ऑफिसर नेमण्यात आले आहेत.सर्व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडायची असून कोठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही,यांची काळजी घ्यावी,असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
246 जागेसाठी 542 जण रिंगणात
तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीच पैंकी 1 ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.तर 31 सदस्य बिनविरोध निवडण्यात आले आहे.एक जागा रिक्त राहिली आहे.29 ग्रामपंचायतीच्या 101 प्रभागामध्ये 246 जागेसाठी 542 उमेदवार नशीब अजमावत आहेत.