लिप्ट देऊन लुटणारी टोळी जेरबंद | उमदीचे पो.नि.दत्तात्रय कोळेकर यांची सतर्कता; सांगोला पोलीसांची कारवाई
जत,प्रतिनिधी : जत पुर्व भागातील सीमावर्ती भागातील रस्त्यावर लिप्ट देऊन लुटणारी टोळीला जेरबंद करण्यात उमदी ठाण्याचे सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर यांच्या सतर्कतेमुळे सांगोला पोलीसांनी त्यांना जेरबंद केले आहे.दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे, तर एकजण फरार झाला आहे.
अधिक माहिती अशी, कर्नाटकातील एक महिला मंगळवेढा तालुक्यातील लग्न कार्याला जाण्यासाठी चडचण-उमदी रस्त्यावर थांबली होती.
त्यादरम्यान एक पांढरी स्विफ्ट गाडी आली, त्यांनी त्या महिलेला आम्ही सोडतो म्हणून गाडीत बसविले.पुढे थोड्या अंतरावरील हरोली येथे महिलेला मारहाण करून साडेपाच तोळे सोन्याचे दागिणे काढून घेत त्यांना सोडुन गाडी जतकडे वेगाने गेली होती.त्या दरम्यान उमदी पोलीस निरिक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी सतर्कता दाखवत जत,मंगळवेढा,सांगोला तालुक्यातील पोलीसांना याबाबत सुचना दिल्या.व टोळीचा पाठलाग सुरू केला होता.

दरम्यान सांगोला हद्दीत नाकाबंदी करणाऱ्या पथकाला ही गाडी पकडत दोघा संशयिताना ताब्यात घेतले आहे.एकजण फरार झाला आहे.या संशयितांनी जत,उमदी हद्दीत केलेले अनेक गुन्हे उघड होणार असल्याचे कोळेकर यांनी सांगितले.