जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील संख अप्पर तहसील हद्दीतील भिवर्गी-करजगी जवळ सुरू असलेल्या बेसुमार वाळू तस्करीवर प्रांताधिकारी प्रंशात आवटे,जतचे तहसीलदार सचिन पाटील यांच्या पथकांने छापा टाकला.त्यात तब्बल 3 जेसीबी,2 ट्रक्टर, 1 टिपर अशा सहा वाहने जप्त केली.
संखचे अप्पर तहसील यांच्याकडून या वाळू तस्करांना अभय दिल्याची चर्चा होती.त्यामुळे तब्बल चार किलमीटर नदीचा खोदून बेसुमार वाळू काढली जात होती.याबाबत दैनिक संकेत टाइम्समध्ये गेल्या दोन दिवसापासून वस्तूनिष्ठ बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.
त्याची गंभीर दखल घेत प्रांताधिकारी प्रंशात आवटे, जतचे तहसीलदार सचिन पाटील,मंडल अधिकारी,चार तलाठी,कोतवाल अशा मोठा कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह पथकाने भिवर्गी-करजगी दरम्यानच्या चेन्नई डेअरीजवळ छापा टाकला.त्यावेळी थेट तीन जेसीबी लावून वाळू काढली जाताना आढळून आली.तिन्ही जेसीबी,एक टिपर,दोन ट्रक्टर अशी वाहने जप्त करत मोठा वाळू साठा पथकांने ताब्यात घेतला आहे.या वाहनासह बेकायदा वाळू प्रकरणी तब्बल तीस लाखावर दंडाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
वाळू तस्करांना अभय देणारे अप्पर तहसीलदारांना वगळून कारवाई
संखचे नव्याने आलेले अप्पर तहसीलदार यांनी गेल्या अनेक दिवसापासून बेसुमार वाळू तस्करी सुरू असतानाही कारवाई केली नव्हती.त्यांनीच या वाळू तस्करांना अभय दिल्याची चर्चा होती.त्यामुळे प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांच्या पथकांने त्यांना सोबत न घेताच केलेल्या कारवाईची सर्वत्र चर्चा आहे.
अप्पर तहसीलदारांची चौकशी करा ; विक्रम ढोणे
संखचे नुतन अप्पर तहसीलदार गेल्या अनेक दिवसापासून कोणाकडे पदभार न देता गेल्या अनेक दिवसापासून बेकायदा रजेवर होते.नेमके जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांचे हे वर्तन चुकीचे आहे.सध्या शैक्षणिक दाखले,शेतीच्या योजनासाठी लागणारे कागदपत्रे वेळेत देण्याची गरज असतानाही अप्पर तहसीलदार बेकायदा रजेवर गेल्याने या परिसरातील पालक,शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले होते.त्यांच्या हद्दीतच सोमवारी वाळू तस्करीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. नेमके इतका गंभीर प्रकार सुरू असताना अप्पर तहसीलदार यांचा बेजबाबदार पणा निंदनीय असून त्यांची खातेनिहान चौकशी करावी,अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे.
करजगी-भिवर्गी दरम्यान प्रांत आवटे यांच्या पथकांने पकडलेली वाहने