बेंळूखीत पवनचक्कीसाठी प्रशासनाकडून नियम ढाब्यावर ; शेतकरी आंदोलन करणार

0जत,प्रतिनिधी : बेंळूखी ता.जत येथे एका  खाजगी पवनऊर्जा कंपनीच्या पवनचक्की उभारणीचे काम सुरू असून सर्व नियम ढाब्यावर बसवून काम सुरू असून स्थानिक शेतकऱ्यांवर थेट अन्याय केला जात असल्याचे आरोप होत आहेत.जून्या परवाना दाखवून थेट ग्रामपंचायती लाही कंपनीने फसविल्याचे आरोप आहेत.नुकताच ग्रामपंचायतीने या कंपनीला पवनचक्की उभारणीसाठी दिलेला परवाना रद्द करण्याचा ठराव घेतला असून गावात पवनऊर्जा‌ कंपनीकडून जत पोलीसांच्या बळाचा वापर करून बेकायदा कामे सुरू करण्यात आली आहेत.ही कामे तात्काळ बंद‌ करावीत,अन्यथा पवनचक्की जवळ ग्रामस्थासह ठिय्या मांडू असा इशारा माजी उपसंरपच,विद्यमान ग्रा.प.सदस्य संभाजी कदम यांनी दिला आहे.
Rate Card
प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वच नियम ढाब्यावर बसविण्यात आले आहेत.पवनचक्की उभारणी ठिकाणापर्यतचे रस्ते,बांधकामे,परवाने,हरितलवादच्या सुचना सर्व ढाब्यावर बसविण्यात आले आहेत.नागरिकांनी विरोध केल्यास थेट पोलीस बंळाचा वापर केला जात असून मोठ्या घटना घडल्यावर वेळेत न येणारे पोलीस पवनऊर्जा कंपनीने लक्ष्मीदर्शन केल्यानंतर तात्काळ बेंळूखीत पोहत‌ आहेत,असा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.