मुंचडी रोड अपघातप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल

0जत,प्रतिनिधी : जत-विजापूर मार्गावरील लिंक ढाब्याजवळ अपघात प्रकरणी पोलीसात ट्रक चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

अपघातात लायाप्पा सिद्राया पुजारी रा.सिध्दनाथ यांचा मुत्यू झाला होता.राहूल नामदेव हिप्परकर रा.सिंगनहळ्ळी असे गुन्हा झालेल्या चालकाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी,मयत लायाप्पा पुजारी व बसाप्पा नंद्याप्पा बन्नूर दोघे रा.सिध्दनाथ हे दोघे जतहून सिध्दनाथकडे चालले होती.दरम्यान विजापूर कडून जतकडे येणारा मालवाहतूक ट्रकने (एमएच 46,बीएम 7177) पुजारी यांच्या दुचाकीला धडक दिली.त्यात पुजारी थेट चाकाखाली गेल्याने त्याचा जागीच मुत्यू झाला तर पाठीमागे बसलेले बसाप्पा बन्नूर उडून बाजूला पडल्याने बचावले आहेत.अपघात भयानक भिषण झाला आहे.याप्रकरणी पोलीसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.