जतमधील मुख्याध्यापक अखेर निलंबित
जत,प्रतिनिधी : जतमधील दिंव्याग शिक्षकेला त्रास देणारा जिल्हा परिषद शाळा नं.2 मधील मुख्याध्यापक शिवाजी विठ्ठल जाधव यांना अखेर निलबिंत करण्यात आले आहे.केंद्र प्रमुख वळवे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
जिल्हा परिषद शाळा नं.2 मधील मुख्याध्यापक हे शाळेतील दिव्यांग सहशिक्षका संगिता काबंळे यांना मुख्याध्यापक जाधव हे दिंव्यागावरून अपनास्पद वागणूक देतात,शिवीगाळ करतात,याची तालुका स्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दखल घेत नाहीत,म्हणून कांबळे यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल केली होती.
त्यांच्या तक्रारीवरून कवटेमहांकाळ गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून अहवाल दिला होता.तसेच जतचे गटविकास अधिकारी यांनी याबाबत स्वतंत्र अहवाल दिला होता.त्याआधारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर सुनावणी झाली होती.त्यात जाधव दोषी आढळल्याने त्यांना अखेर निलबिंत केले आहे. यामुळे जत तालुक्यातील शिक्षण क्षेतात खळबंळ उडाली आहे.