जत नगरपरिषदेचे नियमबाह्य कामकाज ; विक्रम ढोणे l भ्रष्ट कारभाराने नगरपरिषद बदनाम

0
6



जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषदेचा कारभार शासकीय नियमानुसार न होता मनमानी पद्धतीने सुरू असल्याने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नियमबाह्य व भ्रष्ट कामकाजाबाबत लक्ष घालावे,असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केले आहे

जत नगरपरिषद अंतर्गत होणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन व इतर विविध विकासकामे राबवण्याची ई निविदा प्रक्रिया शासन नियमानुसार राबवली जात नाही.जाचक नियम अटी घालून ठराविक ठेकेदारांनी भाग घ्यावा या हेतूने आजपर्यंतच्या सर्व ई निविदा प्रक्रिया  राबवली जाते,याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी,निवेदने देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तर जिल्हा प्रशासन सुद्धा याकडे गांभीर्याने पाहत नाही फक्त कागदोपत्री सोपस्कर पार पाडले जाते. जिल्हा प्रशासनाची या मनमानी कारभाराला मूकसंमती आहे का? असा प्रश्न पडतो.

 








जत नगरपरिषदेच्या भ्रष्ट कारभाराच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय चौकशी झाल्या चौकशी अहवाल प्राप्त झाले असून चौकशी अहवालातून भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले आहे.कोट्यवधी रुपये वसुलपात्र आहेत, अनेक गंभीर दोष निदर्शनास आले आहेत तरीसुद्धा जिल्हा प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. यावरून जत नगरपरिषदेच्या भ्रष्ट कारभाराला जिल्हा प्रशासनाचा पाठिंबा असल्याचे दिसून येते पण शासकीय निधीचा मनमानी पद्धतीने गैरवापर केल्याचे दिसून येते.जत नगरपरिषदेचा सर्व कारभार हा मनमानी पद्धतीने सुरू असून शासन नियमावली व परिपत्रकानुसार कोणतेही कामकाज होत नाही.









शहरात नव्याने केलेले अनेक रस्त्याची कामे अर्धवट ठेवण्यात आली आहेत. निधी मात्र सर्व खर्च‌ झाला आहे.भ्रष्ट अधिकारी,कर्मचारी,पदाधिकाऱ्यांची एक  प्रकारे टोळीच कार्यरत झाली आहे. जनतेच्या हितासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीच जत नगरपरिषदेच्या नियमबाह्य कामकाजाबाबत लक्ष घालावे व भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या प्रकरणावर तातडीने कारवाई करावी,असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केले आहे




नगरपरिषदेच्या सर्व साधारण सभेचे कामकाज सुद्धा शासन नियमाने चालवले जात नाही.शहरातील मुख्य कार्यालय सोडून डफळापूर रोडलगतच्या पाण्याच्या टाकीजवळ संमातर कार्यालय स्थापन करण्यात आले आहे.नगरपरिषदेचा भ्रष्ट कारभार येथून चालविला जात आहे.मुख्याधिकारी,कर्मचारी नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष,सभापती,

नगरसेवकांचा या संमातर कार्यालयात ठिंया असतो.त्यामुळे नगरपरिषद नव्हे भ्रष्ट परिषद असे नामकरण करण्याची आता वेळ आल्याचेही ढोणे म्हणाले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here