जतचे कोरोना योध्दा ; डॉ.रविंद्र आरळी
जत येथील उमा हॉस्पिटल व मिरज येथे सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रभाव असताना डॉ.आरळी यांनी जत व मिरज येथे कोविड हॉस्पिटल चालू करून सामाजिक बांधिलकी जपली होती.सगळीकडे हाहाकार सुरू असताना डॉ.आरळी यांचे कोरोना संकट हटविण्यात मोठे योगदान आहे.त्याशिवाय जत शहरात कोरोनाचा कहर सुरू असताना कै.सौ.शां.शि.आरळी,उमा हॉस्पिटल या ठिकाणी अन्य आजारावरील सेवा चोविस तास सुरू ठेवण्यात आल्या होता.खऱ्या अर्थाने डॉ.आरळी यांचे सामाजासाठी असणारे योगदान उल्लेखनीयच नव्हे तर तालुक्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवणारे आहे.तालुक्याला डॉ.रविंद्र आरळी यांच्या रूपाने कोहिनूर हिरा मिळाला असून तो कायम आपला चमक टिकवित जनकल्याणाचे काम करणार ऐवढे निश्चित आहे.अशा कोहिनूर हिऱ्याला दिर्घायुष्य लाभों हि प्रार्थना..
