बेकायदा वाहतूक होणारी दारू जप्त
जत,प्रतिनिधी : बेवनूर ता.जत येथे बेकायदा वाहतूक केली जाणारी देशी दारूचे 10 बॉक्स जत पोलीसांनी जप्त केले.वाळेखिंडी ता.जत येथून सांगोला तालुक्यातील काही गावात विना परवाना दारू पोहच करणाऱ्या एका एंजन्टाला सचिन मदने व काही नागरिकांनी जूनोनीकडे जाताना पकडले.त्याच्याकडे देशी दारूच्या बॉटल आढळून आल्या.जत पोलीसांनी घटनास्थळी पोहचत दारूच्या बॉटल,दुचाकी ताब्यात घेतली आहे.
संबधित एंजन्ट पळून गेला आहे.उत्पादन शुल्क विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे दुर्लक्षामुळे गावागावातील परवाना धारक दुकानदार अशा दारूचा बेकायदा दारू विक्री करत आहेत.यात अनेक ठिकाणी बनावट दारू विकली जात असल्याना उत्पादन शुल्क व पोलीसाची छुप्पी अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या बनावट दारूमुळे नाहक जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे का? असाही सवाल उपस्थित होत आहे.
बेवनूर ता.जत परिसरात पकडलेली दारू