जतसारख्या दुष्काळी भागात परिवर्तन करण्याची गरज : तुकाराम बाबा
जत,प्रतिनिधी : जत सारख्या दुष्काळी तालुक्यात आपल्या लेखणीतून शासन,प्रशासनाला जागे करणे, समाजजागृती करणे हे अवघड कार्य आहे, पण अवघड कार्य दुष्काळी जत तालुक्यातील पत्रकारांनी प्रामाणिकपणे केले.असे अवघड अनेक काम पत्रकार बांधवाचे कार्य उलखनीयच असल्याचे प्रतिपादन चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे तुकाराम बाबा यांनी केले.
जत तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानावरून तुकाराम बाबा महाराज बोलत होते. व्यासपीठावर तुकाराम बाबा महाराज यांची आई व वडील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रासपचे माजी जिल्ह्याध्यक्ष अजित पाटील, शहराध्यक्ष भूषण काळगी, मानवधिकार संघटनेचे संजय धुमाळ, अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष दिनराज वाघमारे,
मारुती मदने प्रमुख उपस्थितीत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जाभेकर यांच्या प्रतिमेचे पूजनाने कार्यक्रमास सुरूवात झाली. सर्व पत्रकारांचे छायाचित्र असलेले कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी श्रीसंत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे प्रशांत कांबळे,मोहसीन मणेर, विवेक टेंगले विशाल महारनुर, रामचंद्र रणशिंगे, रामदास शिंदे, विक्रम कांबळे, बाळासाहेब मोटे,श्री.येरणाल, फारुख नदाफ,जयदीप मोरे आदी उपस्थित होते.
सात जूनला संख ते मुंबई मंत्रालय पाण्यासाठी पायीदिंडी

जत तालुक्यातील शेवटच्या गावापर्यत पाणी येईपर्यत आपला पाण्यासाठीचा राजकारण विरहित लढा सुरूच राहणार आहे.येत्या सात जूनला पुन्हा संख ते मुंबई मंत्रालयापर्यत पायी दिंडी काढण्यात येणार असल्याचे यावेळी तुकाराम बाबा यांनी जाहीर केले.
संख येथील बाबा आश्रमात पत्रकारांच्या सत्कार करण्यात आले