जत,प्रतिनिधी : वळसंग ते आंसगी(जत)पर्यतच्या रस्त्यावर खड्ड्याचे सामाज्र पसरले असून अनेक ठिकाणी पडलेले खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत.वळसंग ते सोरडी,गुड्डापूर,आंसगी (जत)ते संख असा हा महत्वाचा मार्ग आहे.या रस्त्यावर प्रसिद्ध धार्मिक स्थल गुड्डापूर हेही येते.या मार्गाचे काम गेल्या दोन वर्षापुर्वी झाले आहेत.त्यानंतर काही दिवसात या मार्गावर खड्डे पडले आहेत. तेव्हापासून पडलेले खड्डे कायम असून पावसाळ्यात यातच पाणी थांबून खड्ड्याचा घेर वाढला आहे. त्यामुळे या मार्गावरून येणाऱ्या वाहनचालकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.बांधकाम विभागाच्या भ्रष्ट कारभाराचा आदर्श नमुना म्हणून हा रस्ता प्रसिद्ध आहे.तालुक्यातील भ्रष्ट यंत्रणेचा वास या रस्त्याला लागल्याने खड्ड्याचे ग्रहण कायम आहे.