जतचे बंद कोविड सेंटर तात्काळ सुरू करा ; संजय कांबळे

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यासह शहरातून गायब झालेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.तर कोविड सेंटर बंद करण्यात आल्याने कोरोना बाधितामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. बंद केलेली कोविड सेंटर राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यानी त्वरीत सुरू करण्याचे आदेश द्यावेत,अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष आयु संजय कांबळे यांनी आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. त्यानी निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनाने कोरोनाचा मोठ्या प्रमाणात झालेला प्रसार रोखण्यामध्ये यश मिळवले असलेतरी अजून कोरोना ही महामारी पूर्णपणे संपलेली नाही.तरीही प्रशासनाने राज्यातील कोविड सेंटर बंद करण्याचा घाईघाईत निर्णय घेतला आहे.हा निर्णय किती घातक ठरेल हे येणारा काळच ठरवेल.कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जत तालुक्यातील गुड्डापूर येथिल श्री.धानम्मा देवीची व जत येथिल श्री.यल्लमा देविच्या मोठ्या प्रमाणात भरणारे यात्रेसह अन्य यात्रा व उरूस रद्द करण्याचे आदेश दिले असलेतरी सद्या होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकात होत असलेल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते छाननी व अर्ज माघारी घेणे या प्रक्रियेवेळी होणारे लोकांच्या गर्दीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. उमेदवारासह त्यांच्याबरोबर आलेल्या लोकानी तोंडाला मास्क न लावणे, सामाजिक अंतराचे पालन न करणे, सॅनिटराइजचा वापर न करणे अशा लोकावर काहीही कारवाई केली नाही.


जत तालुक्याचा विचार केला तर जत तालुक्यातील कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची संख्या ही बाविसशेच्या जवळपास गेली आहे तर कोरोनाने सहासष्ट लोकांचा बळी गेला आहे.त्यातच तालुक्यातून कोरोना गायब झाला आहे असे वाटत असतानाच कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.चार दिवसातच तालुक्यातील सोळा लोक कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आले आहेत. यामध्ये एका राष्ट्रीयकृत बॅकेच्या मॅनेजरचाही समावेश असून एका सेवानिवृत्त बँक अधिकारी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चार व्यक्तीनाही कोरोनाची लागन झाली आहे.तर एका  सराफ व्यवसाईकासह त्याची पत्नीही  कोरोना पाॅझीटीव्ह अहवाल आला आहे.कोरोना पाॅझीटीव्ह मध्ये व्यापारी इस्टेट एजंट यांच्या कुटुंबातील लोकांचा समावेश असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
Rate Card
कोरोनावर जरी लस उपलब्ध झाली असलीतरी लोकांनी अजून काही काळ तरी कोरोनाचे नियमांचे पालन करणे त्यांच्या दृष्टीने सुरक्षेचे ठरणार आहे.महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे ब्रिटन मधून आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन हा महाराष्ट्रात आला असून या नवे स्ट्रेनचे आठ रूग्ण महाराष्ट्रातील पुणे,मुंबई सह अन्य जिल्ह्यात आढळून येत असल्याने राज्य सरकारपुढे या नव्या स्ट्रेनचे मोठे संकट उभे राहीले आहे.


हा नवा स्ट्रेन महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पोहोचू नये याची राज्य सरकारने काळजी घेतली पाहिजे.ज्या ज्या ठिकाणी कोरोनाचे रूग्ण परत मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत,अशा ठिकाणची कोविड सेंटर आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांनी पुर्ववत त्वरित सुरू करण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला द्यावेत,अशी मागणी ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी डाॅ. श्री. अभिजीत चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.संजय साळुंखे, राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंत पाटील, राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री ना. डाॅ.विश्र्वजित कदम, उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे, तहसिलदार सचिन पाटील, जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मनोज देसाई व तालुका आरोग्य अधिकारी संजय बंडगर यांना पाठविल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.