दरिबडचीचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात | 500 रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले

0जत,प्रतिनिधी : दरिबडची (ता.जत)येथील तक्रारदार यांचे भावाचा इकराराची नोंद घेवून इकरार देण्याकरीता 500 रूपयाची लाच स्विकारताना दरिबडचीचा तलाठी विलास भरमन्ना चव्हाण(वय 48) याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.तलाठी श्री.चव्हाण यांनी तक्रारदार यांचेकडे भावाची इकराराची नोंद घेऊन ई करार देण्यासाठी 500/- रूपयाची लाच मागणी केली असल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे दाखल झाली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आज दिनांक 6/1/2021 रोजी ब्यूरोच्या

कार्य प्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये तलाठी श्री.चव्हाण यांनी तक्रारदार यांच्याकडे चर्चअंती 500/- रूपये लाचेची मागणी करत लाच रक्कम घेवून येण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.


Rate Card
त्यानंतर लागलीच तलाठी कार्यालय दरीबडची,ता.जत येथे सापळा लावला असता श्री. विलास भरमन्ना चव्हाण (वय 48),तलाठी वर्ग-3 यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून तक्रारदार यांचेकडून 500/- रूपये लाच रक्कम स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने श्री.विलास भरमन्ना चव्हाण यांचे विरुध्द जत पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु केली आहे.सदरची कारवाई श्री.राजेश बनसोडे(पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक),श्री.सुहास नाहगेडा (अपर पोलीस उप आयुक्त/अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली श्री.सुजय घाटगे (पोलीस उपअधीक्षक अन्टी करप्शन ब्युरो सागली)श्री.प्रशांत चोगुले (पोलीस निरीक्षक) तसेच पोलीस अंमलदार सपोफौ रविंद्र धुमाळ,पो.हे.सालीम मकानदार,संजय संकपाळ, संजय कलकुटगी, पो.गा.प्रितम चौगुले, धनंजय खाडे, पो.कॉ. सुहेल मुल्ला, मपोशि जाधव,चालक पवार यांनी केली आहे.नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, बदाम चौक, सांगली. येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रंमाक 0232/2273095 वर तसेच हेल्प लाईन क्रमांक 1064 तसेच हॉट्स अँप नंबर 7875333333 व मोबाईल नंबर 8975651265 तसेच संकेतस्थळावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.