जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कमी झालेला कोरोना बाधित रुग्णाचा आकडा वाढला असून मंगळवारी तब्बल 10 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.
जत तालुक्यात गेल्या दोन महिन्यात कोरोना बाधित संख्या पुर्णत: कमी झाली होती.चार ते पाचच्या पट्टीत रुग्ण आढळून येत होते.मंगळवारी हे रेकार्ड तोडत रुग्णसंख्या दहावर पोहचली.जत शहरात 8,कासलिंगवाडीत 2 येथे नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
जत येथील यल्लमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढल्याने चिंता वाढली आहे.जत येथील शासकीय,खाजगी कोरोना रुग्णालये बंद करण्यात आली आहेत.त्यातच रुग्णाचा आकडा वाढल्याने उपचारासाठी मिरज,सांगली येेथे जावे लागत आहे. तालुक्यातील बाधित संख्या यामुळे1982 वर पोहचली असून 1872 जण कोरोना मुक्त झाले आहेत.सध्या 43 जणावर उपचार सुरू आहेत. तर 66 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.दरम्यान रुग्णसंख्या वाढल्याने दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.