स्त्रियांनी सावित्रीमाई फुले सारखे कणखर बनावे ; प्रा. नंदा पाटील
मिरज,प्रतिनिधी : स्त्री ही कुटुंबाची, समाजाची मार्गदर्शक आहे, व आजच्या युगातील स्त्रियांनी सावित्रीमाई फुलेंचा वारसा चालविताना कणखर बनले पाहिजे असे विचार प्रा.नंदा पाटील यांनी मांडले.त्या कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य संलग्न कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा सांगलीच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त आदर्श शिक्षिका पुरस्कार कार्यक्रम सोहळाप्रसंगी बोलत होत्या.
छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेस महासंघाचे महासचिव नामदेवराव कांबळे, प्रा. नंदा पाटील, प्रा. डॉ. माधुरी देशमुख, नंदकुमार कोरे, वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी, विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे, महिला आघाडी प्रमुख विनोदिनी मिरजकर, यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले “आदर्श शिक्षिका पुरस्कार ” सौ. सुनिता माने, सौ. शुभांगी मन्वाचार, सौ. सुरेखा राजेंद्र कासार, सौ. स्वाती रघुनाथ बाबर आर. अंजुम राजमहमद मोमीन, सौ. स्मिता सुरेश पाटील, आसमा ईलाही शेख, सौ. सुरेखा कांबळे, सौ. सीमा सावंत, पुनम होलमुखे, या जिल्ह्यातील दहा शिक्षिकांचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

महासंघाचे राज्य उपाध्यक्ष सुशीलकुमार कांबळे, सां.मि.कु.महानगरपालिका अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी चिंतामणी कांबळे, विभागीय कार्याध्यक्ष डॉ.बाळासाहेब व्हनखंडे,जिल्हा सचिव बाबासाहेब माने, उपाध्यक्ष संजय सावंत,उपाध्यक्ष महमदरफिक पटेल, कार्याध्यक्ष लखन होनमोरे, सचिव विद्याधर रास्ते, कोषाध्यक्ष दयानंद सरवदे, मुख्य संघटक अशोक हेळवी, अति. संघटक टी. आर नदाफ, मिरज तालुका अध्यक्ष प्रशांत जाधव, कडेगाव तालुका अध्यक्ष भगवान भंडारे, दादासो कांबळे, महिला प्रतिनिधी कमल चव्हाण, पौर्णिमा व्होटकर, अनिता प्रज्ञावंत, रुपाली चोथे, पाटबंधारे अध्यक्ष कुमार कांबळे,नागसेन कदम, कृष्णा मासाळ आदी उपस्थित होते.
जत : ‘काष्ट्राईब शिक्षक’ संघटनेकडून आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आले.