सोमवारी नवे तिघे कोरोना बाधित
जत,प्रतिनिधी : जतेत तीन नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
जत तालुक्यात कोरोना बाधित सध्या नियंत्रित आहेत.मात्र दररोज तीन ते पाचपर्यत नवे बाधित रुग्ण आढळून येत असल्याने भिती कायम आहे.त्यातच शहरात ग्रामपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने कोरोना सुरक्षेचे बाजार मांडला होता.मास्क,सँनिटाइझर, सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला होता.शेकडो लोक जतमध्ये आठ दिवसात ढेरेदाखल होत होते.त्यामुळे कोरोनाची भिती व्यक्त होत आहे.
सोमवारी जत 2,रावळगुंडेवाडी 1,येथे कोरोना बाधित आढळून आले आहेत.तर दोघे कोरोना मुक्त झाले आहेत.33 जणावर सध्या उपचार सुरू आहेत.