जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील लढती सोमवारी माघारीनंतर स्पष्ट झाल्या आहेत.माघारी दिवशी तब्बस 317 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले.त्यात टोणेवाडी,लमांणतांडा(उटगी) या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.तर तब्बल 32 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
सोमवार माघारीचा दिवस महत्वाचा ठरला,अनेक मुदत संपलेल्या ग्रामपंचायती साठीच्या निवडणूकीचे उमेदवारी अर्ज माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे.तालुक्यातील तीस ग्रामपंचायतीच्या 278 जागासाठी आता 540 जण लढणार आहेत.सोमवारी माघारीनंतर तालुका प्रशासनाकडून उमेदवारांना चिन्हेही वाटप करण्यात आली आहेत.तीस ग्रामपंचायतीपैंकी 28 ग्रामपंचायतीसाठी दुंरगी,तिंरगी लढती होणार आहेत.या ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे.
सोमवारी या गावातील उमेदवार बिनविरोध झाले,अंकलगी 1,जालिहाळ खुर्द 1,लमाणतांडा(उटगी) 7,लमाणतांडा (दरिबडची)6,मोरबगी 1,सोनलगी 1,तिकोंडी 8,टोणेवाडी 7 असे 32 सदस्य बिनविरोध निवडणून आले आहेत. यातील टोणेवाडी,लमाणतांडा (उटगी)दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.तरतिकोंडी,लमाणतांडा(दरिबडची) या ग्रामपंचायती बिनविरोध होण्यात थोडक्यात चुकल्या आहेत.
दरिबडचीत 3 तर लमाणतांडा (दरिबडची)1 जागेसाठी निवडणूक होत आहे.
आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केलेल्या घोषणेला दोन गावातील जनतेनी दाद दिली आहे.
दरम्यान आजपासून आश्वासनाचा पाऊस सुरू होणार असून अडगळीतील नेते,युवक नेते पांढरे कपडे घालून लोंकाच्या प्रश्नावर बोलणार आहेत.
जत तहसील कार्यालयात माघारीची प्रक्रिया सुरू होती.तर माघारीमुळे रस्त्यांना यात्रेचे स्वरूप आले होते.