कर्नाटकातून हरविलेली मुलगी माडग्याळमध्ये‌ सापडली | पोलीस,नागरिकांच्या सतर्कतेमुळे नातेवाईकांचा शोध

0



माडग्याळ,वार्ताहर : कर्नाटक राज्यातील

बन्नहटी गावातील एक पंधरा वर्षीय मुलगी घरात वाद झाल्याने कोणालाही न सांगता गुड्डापुरला आली होती. ती पायी चालत व्हसपेठमार्गे माडग्याळ येथे आली असता पोलीस व ग्रामस्थांच्या सतर्कतेने मुलगीस शोधून तीला पालकाच्या स्वाधीन केले.त्यामुळे त्या मुलीच्या पालकांनी माडग्याळ पोलीस औट पोस्टचे पोलिस आणि ग्रामस्थांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.








कर्नाटक राज्यातील बनहट्टी जिल्हा बागलकोट येथील एक 15 वर्षीय मुलगी दिनांक 1 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता त्या मुलीचे आईसोबत भांडण झाले होते. किरकोळ कारणाने आई रागावल्याने घरात कोणाला न सांगता ती मुलगी बनहट्टी ते गुड्डापुर असे मिळेल त्या वाहनाने प्रवास करत तीर्थक्षेत्र गुड्डापुरला आली होती.




Rate Card




पुन्हा ती मुलगी व्हसपेठमार्गे पायी चालत माडग्याळ येथे आली.यावेळी मुलीचे नातेवाईक यांनी माडग्याळ पोलीस औटपोस्ट येथे येऊन आमची मुलगी हरवल्याची माहिती दिली.पोलीस नाईक राम बन्नेनवर,पोलीस विक्रम घोदे,वसंत बाजीराव सावंत,गुरुसिद्धा माळी यांनी मुलीचा शोध घेत शोध मोहीम सुरु केली. त्यानंतर ती मुलगी माडग्याळ ते उमदीकडे जाणाऱ्या रोडलगत असलेल्या खंडोबा मंदिरा शेजारी थांबलेली दिसून आली.देवाचे पुजारी आबव्वा पुजारी यांनी सदर मुलगीकडे चौकशी करत, तू कोण आहेस कोणत्या गावाचे आहेस इकडे का आलीस अशी विचारपुस केल्यानंतर त्या मुलीने सर्व हकीकत सांगितली.माझ्या आईने रागावल्याने मी एकटीच कोणाला काही न सांगता घरात भांडण करून पळून आल्याचे मुलीने सांगितल्यावर पुजाऱ्याने तात्काळ याची माहिती माडग्याळ पोलीस व ग्रामस्थांना दिली.त्यानंतर पोलीस व ग्रामस्थ मुलीचा शोध घेत मुलीजवळ पोहोचले.








त्या मुलीला ताब्यात घेऊन  मुलीच्या नातेवाईकास‌ संपर्क करता ती सापडल्याची माहिती दिली.नातेवाईक आल्यानंतर पोलिसांनी त्या मुलीस पालकांच्या स्वाधीन केले.पालकांने पोलीस,ग्रामस्थ व पुजाऱ्याचे आभार‌ मानले.याकामी माडग्याळ पोलीस औट पोस्टचे पोलीस नाईक राम बन्नेनवर,पोलीस विक्रम घोदे,वसंत बाजीराव सावंत,गुरुसिद्धा माळी,रमेश चौगुले यांनी मुलीची शोध मोहीम घेऊन मुलीस शोधून काढण्यासाठी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.