जत तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीच्या लढती ठरणार | बाहुबली नेत्याकडून माघारीसाठी साम,दंड,भेदचा वापर
उमराणी,वार्ताहर : जतच्या 30 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 278 जागेसाठी अपक्ष, गावच्या विविध पक्षातून, पूरक नामनिर्देशन अर्जाद्वारे तब्बल 995 इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यातून 19 अर्ज हे छाननीत नामंजूर झाले. त्यामुळे गावपुढारी इच्छुकांना विविध प्रकारची आश्वासने देऊ लागले आहेत.

मात्र अनेक गावातील अपक्ष व पूरक इच्छुक उमेदवारांतून या गोष्टीला विरोध होऊ लागला आहे. आम्ही त्या जागेवर लढणारच अशी त्यांनी भूमिका घेतल्याने एकच गोंधळ निर्माण झाला आहे. त्यातच या गोंधळात नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याच्या दोन दिवसांच्या मुदतीतला शुक्रवारचा दिवस तर गेला, आता फक्त सोमवारचा एकच दिवस उरल्याने गावपुढारी मात्र चांगलेच तणावात आहेत.