बालगाव,वार्ताहर : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक मागासवर्गीय शिक्षक संघटना बहुजन समाजातील शिक्षकांना न्याय व हक्क मिळवून देण्याबरोबरचं त्यांचे आर्थिक हित साधण्यासाठी लढविण्याचा बैठकीत निर्णय झाला.
जिल्ह्यात संघटनेने गेल्या पाच वर्षात फुले, शाहू,आंबेडकर विचारधारा असलेल्या सर्व सभासदांना कशाप्रकारे सर्व संघटनानी वापर करून घेतला आहे.इतर संघटनेत आयुष्यभर एकनिष्ठ राहून कार्य केलेल्या सभासदांना नेहमी सत्तेपासून दूर ठेऊन त्यांना पदापासून दूर ठेवल्याची खंत यावेळी अनेकांनी व्यक्त केली.गतवेळी संघटनेचे उमेदवार नवखे असतानाही त्यांनी 400 वर मतदान मिळविले होते.
गेल्या पाच वर्षांत संघटनेने सभासदांना त्यांची हक्काची जाणीव करून दिली आहे.बहुजन शिक्षक संघटनेने सभासदाच्या न्याय व हक्कासाठी बँकेत उमेदवार उभे करावेत,अशी मागणी जोर धरू लागली आहे.आलटून पालटून सत्ता भोगणारे सत्ताधिश सग्या-सोयऱ्यांचे हित जपत आहेत.बँकेत पदाधिकाऱ्यांची एकाधिकारशाही चालत आहे.सभासदाचे हितापेक्षा मनमानेल असे निर्णय लादण्यात आले आहेत.यंदा सोलापूर जिल्ह्यातीलही सभासद घेण्यात आल्याने सर्वत्र सभासदाची गाठीभेटी घेतल्या जात आहेत.
येत्या काही दिवसात सांगली जिल्ह्यातील सभासदांची भेट घेऊन सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा भांडाफोड करण्याचा निर्णयही या बैठकीत ठरले असून यंदा सक्षम पँनेल बँकेसाठी उभा करण्यात येणार आहे.
संघटनेचे अध्यक्ष संतोष कदम, राज्य उपाध्यक्ष संतोष काटे,पुणे विभागीय सचिव प्रल्हाद हुवाळे, जिल्हा उपाध्यक्ष-मलेशप्पा कांबळे,जिल्हा कार्याध्यक्ष दिलीपकुमार हिंदुस्थानी,सरचिटणीस शिवाजी वाघमारे,तालुकाध्यक्ष मिरज विजय कुरणे,कवटेमहांकाळ
संजय साबळे,जत सुनील सुर्यवंशी हे नियोजन करत आहेत.







