जत तालुक्यात नवे पाच कोरोना पॉझिटिव्ह | शहरात चार रुग्णाची भर
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात रविवारी पुन्हा नवे पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. जत शहर 4,बनाळी 1 येथे कोरोना बाधित रूग्ण सापडलेले आहेत.

तालुक्यात 117 गावापैंकी जत शहर 4,बनाळी 1 येथे नवे पाच रूग्ण सापडले आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत 237 दिवसात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 1969 झाली आहे.तालुक्यात सलग 30 व्या दिवशी एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.तालुक्यात यापूर्वी पेक्षा कमी संख्येने रूग्ण सापडत असल्याने व मृत्यूचे प्रमाण कमी यामुळे नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.