देवनाळच्या वनिता शिंदे यांना पुणे विद्यापीठाची पीएच.डी.पदवीप्रदान
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील देवनाळ या गावच्या वनिता बापू शिंदे यांनी “निवडक आत्मकथनपर लेखांचा चिकित्सक अभ्यास ” या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली आहे.प्राचार्य डॉ.संजय घोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे यांनी संशोधन पूर्ण केले,त्या यशवंतराव चव्हाण (के.एस.सी.) कॉलेज कोल्हापूर येथे मराठी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
प्रा. वनिता बापू शिंदे या शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी खूप खडतर परिस्थितीतून शिक्षण घेतले आहे.त्यांचे प्राथमिक शिक्षण प्राथमिक मराठी शाळा देवनाळ,10 वी पर्यंतचे शिक्षण कन्या हायस्कूल जत तर पदवीपर्यंतचे शिक्षण, राजे रामराव महाविद्यालय जत येथे पूर्ण केले. त्यांना मराठी या विषयातील पुणे विद्यापीठाची पदवी प्राप्त झालेली आहे.

त्यांना कन्या हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका जुलेखा नदाफ तसेच राजे रामराय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विठ्ठलराव ढेकळे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.प्रा.जयसिंगराव सावंत, प्रा.सुखदेव नरळे,प्रा.सौ.निर्मला मोरे,डॉ.अरूण पौडमल,डॉ.सौ.संध्या पौडमल,सौ.धोंडीराम वाडकर,डॉ.सतेश दणाणे,डॉ.कम यांचे सहकार्य मिळाले प्रा. वनिता शिंदे यांना मिळालेल्या पीएच.डी. संशोधन कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.