जत,प्रतिनिधी : येळवी ता.जत येथील प्रकाश बाळासो रुपनूर (वय 29) यांचा संशास्पद स्थितीतील मृत्तदेह आढळून आला आहे.याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुक्रवारी सकाळी हा प्रकार समोर आला.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी,
येळवी पासून एक किलोमीटर अंतरावर पारे रोडला रुपनूर वस्ती येथे प्रकाश आई वडील भावासह राहतो.गुरूवारी सायकांळी तो गावात आला होता.रात्री आठ पर्यत तो नातेवाईकांच्या मोबाईलवर संपर्कात होता.त्यानंतर त्यांचा संपर्क झाला नाही.शुक्रवारी सकाळी पारे रोडला निर्जन स्थळी त्यांचा मृत्तदेह काही नागरिकांना आढळून आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.जत पोलीसांनी मृत्तदेहाचे शवविच्छेदन करून पुढील तपास सुरू केला आहे.दरम्यान प्रकाश यांचा घातपात झाल्याचा संशय वडील बाळासो रूपनूर व भाऊ विक्रांत रूपनूर यांनी व्यक्त केला आहे.