सिंदूरमध्ये मंदिरातील दागिण्याची चोरी
जत,प्रतिनिधी : सिंदूर ता.जत येथील सिध्दारूड मंदिरात देवाचे 37 हजार रूपये किंमतीचे दागिणे चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी मंदिर समितीचे सचिव शिवानंद मल्लाप्पा भाळिकाई रा.सिंदूर यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे,सिंदूर येथील ग्रामदैवत असलेल्या सिध्दारूड मंदिरातील गांबाऱ्याचा दरवाज्या तोडून आतमध्ये प्रवेश करत देवाच्या मुर्तीच्या डोक्यावरील चांदीचा टोप,चांदीचे कडे असे 37 हजाराचे दागिणे चोरट्यांनी चोरून नेहले आहे.शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. पोलीसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.