जत,प्रतिनिधी : जत एसटी आगाराचे प्रमुख विरेंद्र होनराव यांना निलबिंत करण्यात आले आहे.
एसटीच्या मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.श्री. होनराव यांनी आगारातील स्लीपर गाडीच्या साध्या दराने फेऱ्या केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
एसटीच्या ताफ्यातील एशियाड,हिरकणी,शिवशाही आणि स्पिपर कोचच्या गांड्यांना वेगवेगळे प्रवासी दर आकारले जातात.
त्यासंदर्भात आगार व्यवस्थापकांना वरिष्ठ कार्यालयाकडून सुचना देण्यात येतात.त्यानुसार बसेसचे तिकिटाचे दर निश्चित केले जातात.मात्र जत आगारात होनराव यांच्या दुर्लक्षपणामुळे आगाराकडे असलेली स्लीपर कोचची गाडी विजापूर रोडवर फेऱ्यासाठी वापरण्यात आली.त्याचे दर साध्या गाडीचे घेण्यात येत होते.अशाच पध्दतीने तब्बल महिनाभर साध्या दरात बसच्या फेऱ्या करण्यात आल्या.यामुळे महामंडळास तोटा सहन करावा लागला.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपासणीत हा प्रकार निदर्शनास आला.
सांगली विभागातील चौकशी आगारप्रमुख होनराव दोषी आढळले.सांगली विभागातून हा अहवाल मुंबईतील वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता.त्यानुसार श्री.होनराव यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले.आदेश आल्यानंतर सांगलीविभागतून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. सध्या जतचा पदभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे.