दुसऱ्यावेळी लोकनियुक्त संरपच | या गावात घडला इतिहास

0



जत,प्रतिनिधी : सदस्यांनी अविश्वास आणल्यानंतर झालेल्या थेट निवडणूकीत पुन्हा जुन्याच संरपचाचा निवडणून देत,विरोधी गटाचे मनसुबे धुळीस मिळविण्याची घटना रेवनाळ ता.जत येथे घडली आहे.

अविश्वास ठराव दाखल झालेले कॉग्रेसचे नेते धनाजी पाटील लोकातून 16 मतांनी विजयी होत दुसऱ्यावेळी लोकनियुक्त संरपच झाले आहेत.








त्याचे झाले असे,रेवनाळ येथील ग्रामपंचायत निवडणूक 2017 साली झाली होती.त्यावेळी धनाजी पाटील थेट संरपच तर त्यांच्या पँनेलमधून 4 सदस्य  निवडून आले होते.धनाजी पाटील या सदस्यांच्या बरोबर गावाचा ‌कारभार‌ उत्तम हाकत होते.जनतेच्या हिताचा कारभार सुरू असतानाच भाजपा व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांनी पाटील गटाच्या सदस्यांना आपल्याकडे खेचत विद्यमान लोकनियुक्त संरपच धनाजी पाटील यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता.मात्र जिल्हाधिकारी यांनी यावर नव्याने निवड करण्याअगोदर गावातील जनतेचे मतदान घेण्यात यावे,असा आदेश दिला होता.








त्यानुसार दि.1 जानेवारी 2020 ला निवडणूक घेण्यात आली.त्यात विद्यमान संरपच धनाजी पाटील पुन्हा 16 मतांनी आघाडी घेत‌ विजयी झाले आहेत.दरम्यान जनतेचा विश्वास पाटील यांच्यावर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले असून संरपचांना हटविण्यासाठी शक्ती पणाला लावलेले बाहुबली नेते यामुळे तोंडघसी पडले आहेत. संरपच धनाजी पाटील यांच्या विरोधात‌ विद्यमान नऊ सदस्य,आजी माजी जि.प.,पं.स.सदस्य‌ असे मातब्बर नेते असतानाही कॉग्रेसचे कार्यकर्ते व जनतेने पाटील यांनी निवडून दिले आहे.








दरम्यान तालुक्यात होऊ घातलेल्या 30 ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूकी आदी ‌कॉग्रेसला विजयी सलामी मिळाली आहे.संरपच धनाजी पाटील यांचा आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Rate Card









सर्व ग्रामपंचायती कॉग्रेसचा झेंडा फडकवू ; आ.सांवत



जत तालुक्यात कॉग्रेसचा जनाधार वाढला आहे.महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मी तालुक्यातील प्रत्येक प्रश्न संपविण्यासाठी प्रयत्न करत आहे.पाणी,सिंचन,रस्ते,स्थानिक प्रश्न कायमस्वरूपी संपविण्यात येत आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनता कॉग्रेससोबत आहे.तालुक्यात होणाऱ्या तीस ग्रामपंचायतीवर कॉग्रेसाचा झेंडा फडकवू असा विश्वास आ.विक्रमसिंह‌ सांवत यांनी व्यक्त केला.










रेवनाळ ता.जत येथे नव्याने लोकनियुक्त झालेले संरपच धनाजी पाटील यांचा सत्कार करताना आमदार विक्रमसिंह सांवत व मान्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.