अंकलेत घरगुती कारणावरून एकावर हल्ला
जत,प्रतिनिधी : अंकले ता.जत येथे घरगुती कारणावरून चौघांनी कोयता,लोंखडी रॉड,काठीने मारून जखमी केल्याचा गुन्हा जत पोलीसात दाखल झाला आहे.याप्रकरणी जखमी भाऊसाहेब शामराव एडके वय 46,रा.अंकले यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, भाऊसाहेब एडके यांना घरगुती कारणावरून ता.20 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता विकास विलास दुधाळ,श्रींकात युवराज दुधाळ,अमोल विलास दुधाळ,अजय रावसाहेब दुधाळ (सर्वजण रा.अंकले) यांनी कोयता,लोखडी रॉड काठीने मारहाण करून जखमी केले होते.उपचारानंतर एडके यांनी जत पोलीसात धाव घेतली आहे.अधिक तपास हवलदार शंकर पवार करत आहेत.