रस्त्यावरील झुडपामुळे अपघात वाढले | जत तालुक्यातील रस्ते बनलेत अपघात प्रणव क्षेत्र
बालगांव,वार्ताहर : जत पूर्व भागामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे रस्त्याकडेला असणाऱ्या मार्गदर्शक सूचना फलक काटेरी झुडुपे,गावतामध्ये दडपले आहेत.त्यामुळे वाहन धारकांना वळण,गाव,शाळा,पूल,याचा अंदाज येत नसल्याने अनेक वेळा छोटे-मोठे
अपघात नित्याचे झाले आहेत.
त्याचबरोबर तालुक्यातील अनेक गावाच्या रस्त्याच्या कडेला दुतर्फा काटेरी झाडे झुडुपे वाढलेल्या आहेत.यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत.
ही झुडुपे जत वासियासाठी मृत्यूची सापळे बनत आहेत.तालुक्यातील बहुतांश रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज व जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गत आहेत.रहदारीसाठी डांबरीकरणाचे पक्के व कच्चे रस्ते आहेत.यावर्षी दमदार पाऊस झाला आहे, यामुळे रस्त्याकडेला दुतर्फा काटेरी झुडुपे, गवत वाढलेली आहेत.त्यामुळे मार्गदर्शक सूचना फलक दिसेनासे झाले आहेत. त्याचबरोबर रस्त्याची रुंदी कमी झाली आहेत.ही झुडुपे काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांना आदेश द्यावेत व निधी उपलब्ध करून घ्यावेत,अशी मागणी संतोष अरकेरी यांनी केली आहे.
जत तालुक्यातील रस्त्यावर वाढेलेल्या झाड्यामुळे दिशादर्शक फलक झाकले आहेत.