तासगावात सर्पमित्राचा घोणसच्या दंशाने मृत्यू | चिंचणी रोडवरील प्रकार : वर्षाअखेरच्या पूर्वसंध्येस घडली दुर्घटना

0तासगाव : तासगाव – चिंचणी रोडवरील एका शेतकऱ्याच्या द्राक्षबागेतील घोणस पकडत असताना या घोणसच्या दंशाने येथील संजय माळी (वय 48, रा. माळी गल्ली, तासगाव) या सर्पमित्राचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. वर्षाअखेरच्या पूर्वसंध्येस घडलेल्या या दुर्घटनेमुळे माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

येथील संजय माळी हे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतात. शिवाय ते सर्पमित्र म्हणूनही प्रसिद्ध आहेत. तासगाव भागात सर्पमित्र म्हणून त्यांचा नावलौकिक होता. गेल्या अनेक वर्षात त्यांनी शेकडो साप, नाग पकडून त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवले आहे. कुठेही साप, नाग निघाला तरी कोणाचाही फोन आल्यास ते तातडीने घटनास्थळी पोहोचत होते. अतिशय विषारी साप, नाग त्यांनी यापूर्वी पकडले आहेत.

गुरुवारी सायंकाळी तासगाव – चिंचणी रोडवरील एका शेतकऱ्याच्या द्राक्षबागेत दोन घोणस असल्याचे दिसून आले. त्यामध्ये एक नर व दुसरी मादी होती. सबंधित शेतकऱ्याने तातडीने सर्पमित्र संजय माळी यांना फोन केला. नेहमीप्रमाणे माळी तातडीने द्राक्षबागेत पोहोचले. 


Rate Cardबागेत त्यांना नर व मादी अशा दोन घोणस दिसल्या. सुरुवातीला त्यांनी आपले कसब पणाला लावत एक घोणस पकडली. त्यानंतर ही घोणस पोत्यात घातली. नंतर दुसरी घोणस पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र दुसरी घोणस पकडण्यात त्यांना यश येत नव्हते. बरेच प्रयत्न करूनही ही घोणस हाताला लागत नव्हती. दरम्यान, ही घोणस पकडण्याच्या नादात खवळलेल्या या घोणसने माळी यांच्या उजव्या हाताच्या बोटाला दंश केला. काही कळायच्या आत घोणसने दंश केल्याने माळी यांच्या अंगाचा थरकाप उडाला. क्षणार्धात माळी बेशुद्ध पडले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत त्यांची प्राणज्योत मालवली.


      

अचानक घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. बघता – बघता या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरभर पसरली. शेकडो साप, नागांना जीवदान देणाऱ्या एका सर्पमित्राचा असा दुर्दैवी मृत्यू व्हावा, हे वेदनादायी आहे. वर्षाअखेरच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या दुर्घटनेमुळे माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी माळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.